महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वरा भास्करचे पती अडचणीत ? ; प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहितीचा किरीट सोमय्यांचा दावा, निवडणूक आयुक्तांकडं केली 'ही' मागणी

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना शरद पवारांच्या पक्षानं उमेदवारी दिली. मात्र त्यांनी उमेदवारी अर्जात उत्तन्नापेक्षा कित्येक पटीनं एलआयसीचे हप्ते भरल्याचा आक्षेप किरीट सोमय्यांनी घेतला.

Objection On Fahad Ahmed Nomination
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई : अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती आणि आर्थिक बाबींमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणाचा खुलासा त्यांच्याकडून मागवावा, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे.

किरीट सोमय्यांचं पत्र (Reporter)

'फहाद अहमद यांच्या प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती' :फहाद अहमद यांनी निवडणूक आयोगाकडं पुरवलेली माहिती अपूर्ण, न जुळणारी आहे. संपत्तीबाबत आणि मालमत्तेबाबत चुकीची माहिती पुरवल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. फहाद यांनी त्यांच्या मालमत्तेमध्ये सदनिकेचा जंगम मालमत्तेमध्ये अंतर्भाव केला आहे. त्याचा सर्वे नंबर, क्षेत्रफळ किती आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. खरं पाहता सदनिकेचा अंतर्भाव स्थावर मालमत्तेमध्ये करणं गरजेचं आहे. मात्र असं असताना त्याचा उल्लेख जंगम मालमत्तेमध्ये करण्यात आला आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

'उत्पन्नापेक्षा एलआयसीमध्ये गुंतवली कित्येक पटीनं रक्कम' :कर पात्र उत्पन्नामध्ये त्यांनी 4 लाख 90 हजार 140 रुपये उत्पन्न दाखवलं आहे. मात्र, जीवन विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी 20 लाख 59 हजार 583 रुपये खर्च झाल्याचं दाखवलं आहे. याचा अर्थ त्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांनी एलआयसीमध्ये गुंतवलेली रक्कम ही कितीतरी पट जास्त आहे. त्यामुळे त्यांनी उत्पन्नाबाबत दिलेली माहिती न जुळणारी आणि त्याचा ताळमेळ न बसणारा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. उमेदवारानं त्यांच्या गुंतवणूक, शेअर होल्डिंग, विविध कंपन्यांचे मूल्यांकन याबाबत योग्य माहिती निवडणूक आयोगाला दिलेली नाही. उमेदवाराचं उत्पन्न आणि खर्च याच्यात तफावत आहे. 2019 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीत उमेदवाराचं एकूण उत्पन्न केवळ सहा लाख 42 हजार 690 रुपये दर्शवण्यात आलं आहे.

फहाद अहमद यांनी निवडणूक आयोगाला दिली चुकीची माहिती ? :उमेदवार फहाद अहमद यांनी उल्लेख केलेल्या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्या स्ट्राइकिंग ऑफ प्रक्रियेत आहेत. या सर्व बाबींमुळे उमेदवार फहाद अहमद यांनी त्यांचं उत्पन्न, खर्च, विविध कंपन्यांमधील भागीदारी, विविध कंपन्यांमधील गुंतवणूक अशा सर्व बाबतीत अयोग्य आणि चुकीची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या एकूणच प्रकाराची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं सदर उमेदवाराकडून याबाबत खुलासा मागवावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडं केली आहे.

हेही वाचा :

  1. "आमची बायको हिरोईन नाही म्हणून..."; फहाद अहमदच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज
  2. Swara Bhaskar Baby Girl : स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांना कन्यारत्न...
  3. Swara Bhaskar and Fahad Ahmads reception : स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधी, जया बच्चनसह दिग्गजांची हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details