बार्बाडोस WI vs ENG 1st T20I Live Streaming :इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आता T20 सामन्यात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली, तर इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे.
वनडे मालिकेत इंग्लंडचा पराभव : या मालिकेपूर्वी या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यात यजमान वेस्ट इंडिजनं पाहुण्या इंग्लंडचा 2-1 नं पराभव केला. या मालिकेत इंग्लंडचं लियम लिव्हिंगस्टोननं पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व केलं होतं. मात्र यात त्याला यश आलं नाही. आता T20 मालिका जिंकत इंग्लंड संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. तर वेस्ट इंडिजचा संघ मालिका जिंकत आपली विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 T20 सामने खेळले गेले आहेत. यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा आहे. त्यांनी 17 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघानं 13 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजनं घरच्या मैदानावर 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघानं वेस्ट इंडिजमध्ये केवळ 3 सामने जिंकले आहेत. तर, अवे मॅचेसमध्ये वेस्ट इंडिजनं 4 सामने आणि इंग्लंडनं 9 सामने जिंकले आहेत. त्याचप्रमाणे तटस्थ मैदानावर वेस्ट इंडिजनं 3 सामने जिंकले असून इंग्लंडनं एक सामना जिंकला आहे.
खेळपट्टी कशी असेल : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू आणि बॅटमध्ये समान स्पर्धा पाहायला मिळते. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना बाऊन्ससह चेंडू स्विंग करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही या खेळपट्टीची मदत मिळते. नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 10 नोव्हेंबर
- दुसरा T20 सामना : 11 नोव्हेंबर
- तिसरा T20 सामना : 15 नोव्हेंबर
- चौथा T20 सामना : 17 नोव्हेंबर
- पाचवा T20 सामना : 18 नोव्हेंबर
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना रविवारी (10 नोव्हेंबर 2024) होणार आहे.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस इथं खेळवला जाणार आहे.