मुंबई Swapnil Kusale Get Promotion :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं चमकदार कामगिरी करत देशाचं नाव उंचावलं आहे. स्वप्निल यानं ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत प्रथमच कांस्यपदक जिंकलं आहे. स्वप्निल याच्या या जागतिक कामगिरीमुळे भारतीय रेल्वेमध्येही सध्या आनंदाची लाट आहे. स्वप्नील कुसाळे हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासणीस आहे. मात्र, आता स्वप्निल याच्या जागतिक कामगिरीमुळे मध्य रेल्वेनं त्याला 'अधिकारी पदी' प्रमोशन दिल्याचं जाहीर केलं आहे.
स्वप्निलच्या अचूक निशाण्यानं तिसरं कास्यपदक :मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सांगितलं की, स्वप्नील कुसाळे याला लवकरच अधिकारी पदी पदोन्नती देऊन ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) पद दिलं जाईल. बक्षिसाची रक्कमही रेल्वेकडून दिली जाणार आहे. सोबतच स्वप्निल याचं आगमन होताच भव्य स्वागताची तयारी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली आहे. पात्रता फेरीत सातव्या स्थानावर असलेल्या स्वप्नील यानं 8 नेमबाजांच्या अंतिम फेरीत 451.4 गुण मिळवलं आणि तिसरं स्थान मिळविलं. स्वप्निल हे आधी सहाव्या स्थानावर होते. त्यानंतर त्यांनी तिसरं स्थान मिळवलं. स्वप्निल कुसाळे यांच्या अचूक निशानेबाज कामगिरीमुळे या खेळांमधील भारताचे हे तिसरं कांस्यपदक आहे.