महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

नागपंचमी 2024; 'या' राशींवर राहणार नागदेवाची कृपा; वाचा राशीभविष्य - Horoscope 09 August 2024

Horoscope 09 August 2024 : नागपंचमी सणाला (Nag Panchami 2024) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदा नागपंचमी सण शुक्रवार वार 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 5:09 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्यानं गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. जनसंपर्क वाढेल. आपल्या व्यावसायिक क्षेत्राबाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. सेवा कार्यासाठी दिवस अनुकूल आहे. शारीरिक आराम आणि मानसिक प्रसन्नता लाभेल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपलं काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. मित्र व सहकार्यांकडून काही लाभ संभवतात.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. वैवाहिक जोडीदार आणि संतती ह्यांच्या आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. शक्यतो वाद -विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उदभवतील. नव्या कार्याच्या आरंभात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र आणि स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्यानं संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील.
  • सिंह (LEO) :आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळं द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगलं वातावरण राहील्यानं आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्याबरोबरचे संबंध दृढ होतील. ज्यामुळं भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.
  • कन्या (VIRGO): आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक, व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडं लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक, मानसिकदृष्टया अस्वास्थ्य राहील.
  • मीन (PISCES): आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. व्यापारातील वसुली होऊ शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details