मुंबई Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार टक्कर झाली. त्यामुळं देशाचं लक्ष महाराष्ट्रातील निकालाकडं लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये बंड झाल्यानंतरची ही सर्वात मोठी आणि महत्तवाची निवडणूक होती. त्यामुळं निवडणुकीसाठी उमेदवार देण्यापासून ते अगदी आता निकालापर्यंत सर्वांचंच लक्ष महाराष्ट्रातल्या निकालाकडं लागलं आहे.
48 जागांवर संभाव्य विजयी उमेदवारांची नावं : देशभरातील विविध राज्यात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींचं जाळं पसरलं आहे. त्यामुळं या संपूर्ण निवडणूक काळात 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी ग्राऊंडवर जाऊन कव्हरेज केलं. प्रतिनिधींचा मतदारसंघातील अभ्यास, ग्राऊंड रिपोर्टींगचा अनुभव, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत साधलेल्या संवादातून महाराष्ट्रातील 48 जागांवर संभाव्य विजयी उमेदवारांची नावं आम्ही तुम्हाला सांगत आहोत. दरम्यान, ही सर्व नावं संभाव्य विजयी उमेदवारांची आहेत.
संभाव्य विजयी उमेदवारांची नावं, पक्ष आणि मतदारसंघ पुढीलप्रमाणे :
◾ पहिला टप्पा - 19 एप्रिल -
रामटेक : राजू पारवे (शिवसेना)
नागपूर: नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया : सुनील मेंढे (भाजपा)
गडचिरोली-चिमूर : नामदेव किरसान (कॉंग्रेस)
चंद्रपूर : चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर, (कॉंग्रेस)
◾ दुसरा टप्पा 26 एप्रिल -
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर (शिवसेना उबाठा)
अकोला: डॉ. अभय पाटील (कॉंग्रेस)
अमरावती: बळवंत वानखेडे (कॉंग्रेस)
वर्धा: रामदास तडस (भाजपा)
यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख (शिवेसेना उबाठा)
हिंगोली: नागेश पाटील आष्टिकर (शिवसेना उबाठा)
नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर (भाजपा)
परभणी : महादेव जाणकर, रासप
◾ तिसरा टप्पा 7 मे-
रायगड : सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
धाराशीव: ओमप्रकाश राजे निंबाळकर (शिवसेना उबाठा)
लातूर : डॉ. शिवाजी काळगे (कॉंग्रेस)
सोलापूर : प्रणिती शिंदे (कॉंग्रेस)
माढा : धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
सांगली : विशाल पाटील (अपक्ष)
सातारा : शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजपा)