महाराष्ट्र

maharashtra

हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 320 रॉकेट; इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर - Hezbollah Fired Rockets At Israel

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 11:08 AM IST

Updated : Aug 25, 2024, 11:40 AM IST

Hezbollah Fired 320 Rockets At Israel : इराण-समर्थित गट हिजबुल्लाहनं रविवारी इस्रायलवर 320 रॉकेट डागले आहेत. इस्त्रायली सैन्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं. या हल्ल्याला इस्रायल सैन्यानंही प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Hezbollah Attack Israel
हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले रॉकेट (AFF)

बेरूत Hezbollah Fired 320 Rockets At Israel : इराण समर्थित गट हिजबुल्लाहनं रविवारी इस्रायलवर 320 रॉकेट डागले. त्याचवेळी इस्त्रायलनं हिजबुल्लाहचा हल्ला उधळून लावण्यासाठी दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ले केले असल्याचं सांगितलं. त्यामुळं पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर : 'टाईम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, लेबनॉनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनं पुढील ४८ तासांसाठी आणीबाणी जाहीर केली. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी ही आणीबाणी जाहीर केली. युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली जनतेलाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.

320 कात्युशा रॉकेट डागले : हिजबुल्लाहनं दावा केला की, त्यांनी 11 इस्रायली सैन्यांच्या लक्ष्यांवर 320 कात्युशा रॉकेट डागले. लेबनीज दहशतवादी गटानं बेरूतमध्ये आपल्या एका कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर याआधी ड्रोन हल्ले केले होते. हिजबुल्लाहनं केलेल्या रॉकेट हल्ल्याला इस्रायल सैन्यानं प्रत्युत्तर दिलंय. हिजबुल्लाहवर हवाई हल्ले करत अनेक भागांना निशाणा बनवल्याचा दावा इस्रायलनं केलाय.

इस्त्रायली सैन्य टार्गेट : हिजबुल्लाहनं सांगितलं की, हा हल्ला इस्त्रायली सैन्याच्या लक्ष्यावर होता. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. या हल्ल्यात इस्त्रायली सैन्याची अनेक ठिकाणे, बॅरेक्स आणि आयर्न डोम यांनाही लक्ष्य करण्यात आलंय.

इस्रायलकडून हल्ल्याची चेतावणी : इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी दक्षिण लेबनॉनमध्ये असलेल्या लेबनीज नागरिकांना चेतावणी दिली. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांचा बदला म्हणून इस्रायलकडून संभाव्य हल्ल्यांबाबत ही चेतावणी देण्यात आलीय.

Last Updated : Aug 25, 2024, 11:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details