Alcohol Impact On Women Health:सध्या तरूण पिढी पुर्णतः दारुच्या आहारी गेलेली आहे. यामध्ये तरुणी देखील मागे नाहीत. कोणतेही सेलिब्रेशन असो, दारू आता फॅशन झालेली आहे. परंतु, या सवयी सोबमुळे आपण अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण देत आहोत. त्यापैकी एक गंभीर समस्या म्हणजे लठ्ठपणा. यासाठी अल्कोहोल देखील कारणीभूत आहे.
पुरुष आणि स्त्रियांपैकी दारू पिणे कोणासाठी अधिक धोकादायक आहे?
जनरल फिजिशियन डॉ. आशिष चट्टोपाध्याय म्हणतात की, दारू पिणं हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त हानिकारक आहे. याचा महिलांच्या यकृतावर अधिक परिणाम होतो. परिणामी यकृताला नुकसान होण्याचा धोका वाढतो. यामुळे महिलांनी दारू पिणं टाळावं.
पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अमित गावंडे यांच्या मते, दारू पिणाऱ्या महिलांना प्रजननाशी संबंधित समस्या अधिक असतात. तसंच, यकृत खराब होण्याचा धोका देखील पुरुषांमध्ये जास्त असतो.
अल्कोहोलमुळे शरीरातील यकृत आणि इतर अवयवांचं नुकसान तर होतंच. परंतु त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलचं जास्त आणि दीर्घकाळ सेवन हे यकृताच्या आजारांचं प्रमुख कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगातील सुमारे 70 टक्के लोक यकृताच्या समस्येनं ग्रस्त आहेत. डॉक्टरांच्या मते, पुरुषांपेक्षा स्त्रियांना सिरोसिस आणि अल्कोहोल संबंधित यकृत निकामी होण्याचा धोका जास्त असतो.
याव्यतिरिक्त, NIH अभ्यासानुसार, दारूचं व्यसन पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त धोका निर्माण करते.
भारतातील अनेक लोक लठ्ठपणामुळे विविध आरोग्यच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. अल्कोहोलचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि सिरोसिस सारख्या समस्या निर्माण होतात. अल्कोहोला हेपेटोटॉक्सिन म्हणूनही ओळखलं जातं. अल्कोहोल घेणाऱ्या प्रत्येकालाच यकृतासंबंधित रोग होत नाही. तसंच जास्त मद्यपान केल्यानं मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. यकृताच्या समस्यांसह, हृदयरोग, स्तन आणि इतर कर्करोग, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. पचनाच्या समस्याही दिसून येतात.
महिलांवर कसा परिणाम होतो:तज्ज्ञांच्या मते, दारूचा पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त परिणाम होतो. यामुळे महिलांच यकृत खराब होण्याची अधिक शक्यता असते. कमी दारू प्यायला तरी आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणा ही देखील एक समस्या आहे.