VIDEO : कोल्हापुरात घराच्या भिंतीमधून पाण्याचा लोंढा! नेमकं काय झाले पाहा व्हिडिओ - Kolhapur Municipal Water Supply Department
कोल्हापूर - कोल्हापुरात घराच्या भिंतीमधून पाण्याचा लोंढा बाहेर येत असल्याचा प्रकार समोर ( kolhapur water leakage ) आला आहे. येथील गंगावेश परिसरातील पाडळकर मार्केटसमोर असणाऱ्या यादव गल्ली येथे राहणाऱ्या काही घराच्या भिंतींमधून पाणी येऊ लागल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरांच्या खालून पाईपलाईन गेली आहे. त्या पाईपलाईनला गळती लागल्याने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता सुद्धा इथल्या स्थानिकांनी व्यक्त केली. नेमका काय प्रकार घडला आहे हे पाहून तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारीपासून एकसारखे मोठ्या प्रमाणात भिंतीमधून पाण्याचा लोंढा सुरू आहे. त्यामुळे घरांना सुद्धा धोका पोहोचला असून लवकरात लवकर प्रशासनाने याची पाहणी करून मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST