महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Waghoba Ghat Accident Palghar : वाघोबा घाटात ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात; दोन जणाचा जागीच मृत्यू - विटाचा ट्रक पलटी वाघोबा घाट पालघर

By

Published : Apr 6, 2022, 7:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पालघर - पालघर-मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात विट वाहून नेत असताना ट्रक अचानक पलटी झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. उमेश पवार, रामू पवार असे मृत कामगाराचे नाव आहे. तर 5 कामगार जखमी झाले आहेत. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने व ट्रक ओव्हरलोड असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकवर काम करणारे कामगार ट्रकमध्ये भरलेल्या विटांवर बसले असल्यामुळे ट्रक पलटी झाल्यानंतर हे सर्व कामगार विटांच्या व ट्रक खाली दबले गेले. घनास्थळावरून जाणाऱ्या वाहानचालकांनी आपल्या गाड्या थांबवून विटांच्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. सर्व जखमींना ग्रामीम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details