Rana Couple Arrest : राणा दाम्पत्य अटकेच्या निषेधार्थ युवा स्वाभिमानीच्या वतीने अमरावतीत मूक मोर्चा
अमरावती - अमरातवीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत कोठडी सुनावण्यात ( Rana Couple Arrest ) आली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ( 25 एप्रिल ) शहरात युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते काळी फित लावून हातात युवा स्वाभिमानी पक्षाचे झेंडे हाती घेऊन मूकपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ( Yuva Swabhimani Party Protest ) पोहचले.