इटलीतील मराठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या वर्गमित्रांचे भारतीयांना भावनिक आवाहन - COVID19 NEWS
मिलान (इटली)- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान माजवले आहे. याचा सर्वाधिक फटका इटली या देशाला बसला आहे. या देशात काल ९०० पेक्षा जास्त नागरिक या व्हायरसला बळी पडले आहेत. तर, ९० हजार नागरिक कोरोनाग्रस्त आहेत. दररोज ८०० पेक्षा जास्त नागरिक प्राण गमावत आहेत. या पार्श्वभूमिवर इटलीतील भारतीय विद्यार्थ्यांनी इटलीतील सहकारी विद्यार्थ्यांच्या मदतीने भावनिक आवाहन करणारा व्हिडिओ तयार केला आहे. त्यात प्रत्येक विद्यार्थी भारतीयांना घरीच थांबण्याची कळकळून विनंती करताना दिसत आहे. सोबत इटलीतील सद्यस्थितीही व्यक्त करत आहेत. या व्हिडिओत अनिकेत जोशी हा मराठी मुलगाही आहे. आसिम राज मकानदार आणि शाहू भोईटे यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे.
Last Updated : Mar 28, 2020, 1:35 PM IST