Video : फुटबॉलपटूला लाजवेल असा गायीचा फुटबॉल खेळ; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल... वाह! - गायीचा फुटबॉल खेळ
एका गायीचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे माहीत नाही, पण गाय आंतरराष्ट्रीय खेळाडू मेस्सी आणि रोनाल्डोच्या स्टाईलमध्ये फुटबॉल खेळत आहे. प्रत्यक्षात ही गाय फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने फुटबॉलचा ताबा घेतला. खेळाडूंना फुटबॉल जवळ न येऊ देता ती त्यासोबत खेळत होती. जेव्हा खेळाडू काही युक्त्या करुन गायीकडून फुटबॉल घेण्याचा प्रयत्न करत तेव्हा गाय धावत जाऊन पुन्हा फुटबॉल काबीज करत होती. या गायीची तीक्ष्ण शिंगे पाहून खेळाडूही तिच्या जवळ फिरकले नाहीत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह... फुटबॉलपटू गाय...