कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये हत्ती सुसाट! ड्रायवरच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली; पहा व्हिडीओ
जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या ढिकाला झोनमध्ये हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ढिकाळा झोनमध्ये नेहमीप्रमाणे सफारी कॅंटर पर्यटकासोबत जात असताना अचानक हत्तींच्या कळपातून एक हत्ती कॅंटरच्या दिशेने आला. हत्ती आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून चालकाने गाडी मागे घेतली. यादरम्यान हत्तीने इतक्या जवळून हल्ला केल्याचे पाहून पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली. कॅंटरमध्ये उपस्थित पर्यटकांच्या आरडाओरडाने हत्ती थांबला. हत्ती क्षणभर थांबला आणि दुसऱ्या वाटेला निघाला. कँटर चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वा सुखरूप बचावले.