'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'त पाहणे एक अनोखा अनुभव - वरुण धवन - Varun Dhavan latest news
'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' या चित्रपटाचे प्रमोशन सध्या शिगेला पोहोचलंय. प्रभुदेवा, धर्मेश अशी डान्सरची तगडी टीम आणि वरुण धवन आणि श्रध्दा कपूरची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आता थ्रीडीत पाहायला मिळणार आहे. रेमो डिसुझाचा हा डान्स धमाका चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय, हे ट्रेलरला मिळत असलेल्या प्रतिसादावरुन दिसत आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीम दिल्लीत पोहोचली होती. यावेळी वरुण आणि श्रद्धा यांनी अनेक रंजक किस्से सांगत उपस्थितांना खूश केले.