एनआयने केली व्यावसायिक मयुरेश राऊत यांची सहा तास चौकशी - mumbai live news
मुंबई - मयुरेश राऊत या व्यावसायिकाला शुक्रवारी एनआयए कार्यालयात बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांची एनआयएकडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच मयुरेश यांनी परमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आरोपांमध्ये मयुरेश राऊत यांनी स्वतःच्या 2 गाड्यांचा देखील उल्लेख केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात या गाड्यांचा वापर झाला असल्याचा संशय मयुरेश राऊत यांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच मयुरेश राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार देखील दिली होती. याच प्रकरणी शुक्रवारी एनआयएनं मयुरेश यांचा जबाब नोंदवला. मनसुख हिरेनप्रमाणे माझ्याही जिवाचं बरं-वाईट होऊ शकतं अशी भीती मयुरेश राऊत यांना आहे, ही भीती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलूनही दाखवली.