Shocking Video : दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव! विद्युत खांब आणि झाड कोसळले, काही क्षणामुळे वाचला तो.. - electric pole collapse
इर्नाकुलम (केरळ) : केरळमध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाराने कहर केला आहे. कोथमंगलम, एर्नाकुलम भागात एका घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिज्युअलमध्ये दिसते की झाडाच्या फांदीने विजेचा खांब कोसळतो. आणि त्याचवेळी रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात असतो. त्या दुचाकीस्वाराचे दैव बंलवतंर म्हणून तो वाचला. काही क्षणाचा विलंब झाला असता तर त्याच्या अंगावर विजेचा खांब कोसळला असता. मलयंकीझू-नादुकानी रोडवर ही घटना घडली. सोसाट्याच्या वाऱ्यात तुटलेल्या झाडाच्या फांद्यावरुन एक कारही थोडीशी वाचली. केरळ राज्यातील अनेक भागांतून झाडे पडण्याच्या आणि विजेचे खांब पडण्याच्या घटना घडत आहेत. ( Bike rider and car miraculously escape when electric pole collapse )