Shivsena Teaser : 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो...''; शिवसेनेच्या सभेचा दुसरा टीझर लॉन्च - शिवसेना सभा मराठी बातमी
मुंबई - राज्यातील हिंदुत्वाचे राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबाद सभेपूर्वी टीझर लॉन्च करत शिवसेनेला आव्हान दिले होते. त्यानंतर, आता शिवसेनेकडून 14 तारखेला होणाऱ्या सभेचा दुसरा टीझर लॉन्च करण्यात आला ( Shivsena Teaser ) आहे. यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ( Cm Udhav Thackeray ) जुन्या भाषणांचे व्हिडिओ वापरुन 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,' असे म्हटल्याचे दाखवले आहे. तसेच, देशातील खऱ्या हिंदुत्वाची व्याख्या ऐकण्यासाठी बीकेसीमध्ये यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.