Rana vs Shivsena : शिवसेना अंगार है, बाकी सब.., राणा यांच्या निवासाबाहेर शिवसैनिक आक्रमक - Navneet Rana
मुंबई - राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minster Uddhav Thackeray ) यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसाचे ( Hanuman Chalisa ) पठण करणार असल्याचे समजल्यापासून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शनिवारी (दि. 23 एप्रिल) सकाळपासूनच मातोश्री बाहेरही तसेच नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राणा यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य यांच्यासह मनसेच्या विरोधातही घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.