Shiv Sena Bhavan : 'आम्ही कट्टर शिवसैनिक.. साहेबांच्या आदेशाची वाट बघतोय' - Eknath Shinde
नवी मुंबई - एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आज राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे. मात्र राज्यातील घडामोडी पाहता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यानंतर आता शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. यावेळी काही शिवसैनिकांनी या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत, साहेबांच्या आदेशाची वाट बघतोय, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानंतर शिवसैनिक तुम्हाला बाहेर दिसतील, सध्या आम्हाला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्याने आम्ही काही विशेष बोलणार नाही, ज्यांना जायचे ते जात असतात नेहमी नेते फुटतात आणि कट्टर कार्यकर्ते पक्ष सोबतच असतात असेही एका शिवसैनिकांनी सांगितले आहे. आम्ही ज्या भागात राहतो तेथील परिसर शिवसेनेचा गड आहेत त्यामुळे नेते फुटले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांची ईटीव्ही भारतशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली आहे.