महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut On Sambhaji Raje : संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीबाबत संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले... - Sanjay Raut On Sambhaji Raje

By

Published : May 24, 2022, 1:33 PM IST

मुंबई/कोल्हापूर - माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे बोलणे झाले आहे. आमची राज्यसभा उमेदवारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचे हे सुद्धा ठरले आहे. त्यामुळे मला विश्वास आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात व्यक्त केली. तर दरम्यान संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी प्रतिक्रिया देतांना ( Sanjay Raut On Sambhaji Raje Chhatrapati ) सांगितले की, संभाजीराजे छत्रपती घराण्याचे वंशज असल्याने त्यांना महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे. 'आम्ही छत्रपती घराण्याचा मान ठेवूनच त्यांना शिवसेनेची राज्यसभेची ऑफर दिली होती. दरम्यान संभाजीराजे हे कोल्हापूरवरुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details