मागील दोन वर्षात फक्त 'ती' एकच गोष्ट ऐकायला मिळाली, राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Vikhe Patil criticizes Uddhav Thackeray
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil आहेत. आज ते अमरावतीला कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महसूल विभागाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेणार असल्याचे महसूल मंत्री म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उत्खननसंबंधी किंवा राष्ट्रीय प्रकल्पासाठी महसूल खात्याशी संबंधित काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या सगळ्या बाबींचा आढावा बैठकीत घेणार आहे. तसेच महसूल विभागाच्या नवीन योजनेसंदर्भात प्राथमिक चर्चा अधिकाऱ्यांशी करणार असल्याचं त्यांनी सांगितले Vikhe Patil criticizes Uddhav Thackeray आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषण ऐकण्यामध्ये उत्सुकता नाही, मागील दोन वर्षात फक्त एकच गोष्ट या कालावधीत ऐकायला मिळाली, ती म्हणजे 'माझे कुटुंब तुमची जबाबदारी' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना विखे पाटील यांनी टोला हाणला.