रत्नागिरीत जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद; रस्ते झाले निर्मनुष्य
रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभर जनता कर्फ्यूचे पालन केले जात आहे. दिवसभरात कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या जनता कर्फ्यूला रत्नागिरीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते सध्या निर्मनुष्य झाले असून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. रत्नागिरीतील जनता कर्फ्यूचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...