Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवार हे नास्तिकच - राज ठाकरे - राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका
औरंगाबाद - पूर्वीही देशात जातीचे राजकारण होते. मात्र, जेव्हापासून राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून देशात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमणात केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Sharad Pawar) यांनी केला. तसेच शरद पवार हे नास्तिकच असल्याचे राज ठाकरे म्हणाले. शरद पवार हे नेहमी सांगतात की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांचा आहे. परंतु, आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे गेले आहेत. मी जात मानत नाही. माझा जातीपातीत विश्वास नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Last Updated : May 1, 2022, 10:09 PM IST