VIDEO : पुणे मेट्रोकडून उभारण्यात आलेल्या सायकल, ई-बाईक सुविधेचा फज्जा - पुणे मेट्रो
पुणे - दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. यासोबतच पुणे मेट्रोकडून पुणेकरांच्या सुविधेसाठी सायकल आणि e-vehicles ची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. मात्र सध्या या सुविधेचा फज्जा उडताना दिसून आले आहे. नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सायकल काही पंक्चर आहेत, तर काही सायकल स्टँडवर खासगी सायकल कुलप लाऊन ठेवल्या गेलेला आहे. या सुविधेकडे नागरिकांनीच पाठ फिरवली आहे. याबाबत मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, ई व्हेईकलचे काम पाहणाऱ्या कंपनीला आम्ही सूचित करून ई व्हेईकलकडे लक्ष देऊ. तसेच खासगी वाहनांनी मेट्रोच्या येथे वाहने लावून नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.