नाशिकमध्ये खड्ड्यांसाठी राष्ट्रवादीचं अनोख आंदोलनं...कोणाचं घातलं श्राध्द? पाहा व्हिडीओ - आंदोलनं
नाशिकमध्ये खड्ड्यांची (road potholes) परिस्थिती बिकट झाली असून, तात्पुरते खड्डे बुजवल्यानंतर सततच्या पावसामुळे हे खड्डे पुन्हा निर्माण झाले. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक अपघात होत आहेत. जोपर्यंत पाऊस पूर्णतः थांबत नाही तोपर्यंत खड्ड्यांची दुरुस्ती करता येणार नाही अशी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. नाशिक महानगरपालिकेवर भाजपच्या सत्ता काळात रस्त्यांची निष्कृष्ट दर्जाची कामे झाली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्वपित्री अमावस्या निमित्त भाजप, महानगरपालिका आणि नाशिकला दत्तक घेतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुर्वजांचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले. पाहा व्हिडीओ