Mumbai Bank Case : प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर - अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
मुंबई - मुंबई बँक प्रकरणी ( Mumbai Bank Case ) भाजप नेते प्रवीण दरेकर ( Praveen Darekar ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मंजूर केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे, या अटीवर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे अॅड. अखिलेश चौबे यांनी दिली.