VIDEO : 'हिंमत असेल तर...., नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा - लीलावती रुग्णालय
मुंबई : नवनीत राणा (Maharashtra MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला असून, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Row) वाचणे गुन्हा असेल तर मी १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे. माझी तब्येत अजूनही चांगली नाही. मी सलग १८ दिवस बाहेर होते. जे १४ दिवस तुरुंगात आणि ४ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले. हिंमत असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून निवडणूक लढवा, मी त्या ठिकाणाहून तुमच्यासमोर उभी राहीन आणि जनता तुम्हाला तुमची भूमिका दाखवून देईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना ( Chief Minister Uddhav Thackeray ) दिला आहे.