महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rajesh Tope : शाळेतील मुलांच्या आरोग्यावर संस्थाचालकांनी लक्ष ठेवावे - राजेश टोपे - शाळेतील मुलांच्या आरोग्यावर संस्थाचालकांनी लक्ष ठेवावे राजेश टोपे

By

Published : Jun 12, 2022, 7:19 PM IST

जालना - येत्या 15 जून पासून राज्यभरातल्या शाळा या सुरु आहेत. शाळेत मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही. मात्र, शाळेत येणाऱ्या या मुलांच्या कोरोनाच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे. त्याचबरोबर राज्यात सध्या 15 हजार कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. पण, रुग्णालयांमध्ये गर्दी नाहीये. हे सगळं लस घेतल्यामुळे झाले आहे. तरी ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही आहे. त्या लोकांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी राजेश टोपे यांनी केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details