Nashik Leopard : वनविभागाने आईची आणि बछड्याची घडवून आणली भेट - बिबट्या आणि बछड्याची भेट नाशिक
नाशिक - बिबट्या मादी आणि तिच्या बछड्याची ताटातूट झाल्यानंतर बछडा आईविना कासावीस झाला ( Nashik Leopard ) होता. मात्र, वनविभागाने ट्रॅप कॅमेरा बसवून मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची भेट घडवून आणली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील लक्ष्मण मेढे यांच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले होते. याची माहिती मिळताच वनविभागाने या बछड्यास ताब्यात घेतले. त्यानंतर इको फाउंडेशन स्वयंसेवक संघ आणि वनविभागाने आढळून आलेल्या ठिकाणी बिबट्याला टोपलीत ठेवले. त्याठिकणी ट्रॅप कॅमेरा लावला. त्यानुसार मध्यरात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्या मादी दाखल झाली. तिने टोपली बाजूला सारत बछड्यास जबड्यात पकडून नेले.