महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Python Swallowed Goat भल्या मोठ्या अजगराने गिळली शेळी पाहा व्हिडीओ - शेळी गिळताना अजगर

By

Published : Oct 13, 2022, 9:23 AM IST

नांदेडमध्ये एका अजगराने शेळीवर हल्ला करत पूर्ण शेळीच गिळकृत केल्याची घटना घडली python swallowed goat In Nanded आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंढी या गावाच्या शिवारातील ही घटना आहे. ज्ञानेश्वर घंटेवाड हा शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी चोंडी गावाच्या शिवारात गेला होता. या शेळ्यांच्या कळपावर जंगलात असलेल्या एका भल्या मोठ्या अजगराने झडप मारली. शेळीवर हल्ला करत शेळीला गिळण्याचा प्रयत्न या अजगराने केला. या अजगराच्या तावडीत आपली शेळी सापडल्याचे ज्ञानेश्वर घंटेवाड यांना निदर्शनास आले. या परिसरात झाडे झुडपांची संख्या मोठी असल्याने अजगरासारखे प्राणी या जंगलात वास्तव्यास large python In Nanded आहेत. दरम्यान या शेतकऱ्याने सर्पमित्राला या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र घटनेच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अजगराने संपूर्ण शेळीच गिळंकृत केली Python Swallowed Goat होती. सर्पमित्र क्रॉंती बुद्धेवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या अजगराला पकडले. या बारा फुटाच्या अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलात नेऊन सोडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details