महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : वडिलांच्या खांद्यावर अंघोळ करणाऱ्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू, बनारसहून दर्शनासाठी आले होते कुटुंब

By

Published : Jun 19, 2022, 10:38 AM IST

खांडवा ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर झालेल्या दुर्दैवी घटनेने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. वडिलांच्या खांद्यावर बसून नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. बनारस येथील रहिवासी असलेले प्रमोद सिंह हे शनिवारी आपल्या कुटुंबासह तीर्थक्षेत्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत आठ वर्षांचा मुलगा वंशही होता. येथे ओंकारेश्वर येथे ब्रह्मपुरी घाटावर पिता-पुत्र नर्मदा नदीत स्नान करत असताना बापाने आपल्या मुलाला खांद्यावर धरले होते. मुलाला खांद्यावर घेऊन अंघोळ करत असताना वडील खोल पाण्यात गेल्याने दोघेही बुडू लागले. दरम्यान वडिलांच्या खांद्यावरून तो मुलगा खाली पडला. वडील पोहत कसेतरी बाहेर आले, पण मुलगा बुडाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोकं बचावासाठी आले. घाटापासून काही अंतरावर या बालकाचा मृतदेह आढळून ( son bathing on father shoulder die in Brahmapuri ghat ) आला. बनारस येथील मुलगा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वडील आणि कुटुंबीयांसह आला होता. या घटनेनंतर वडील आणि इतर कुटुंबीयांची मनस्थिती बिघडली आहे. या धक्क्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत. त्याचे वडील सैनिक म्हणून सैन्यात आहेत. घटनेची माहिती मिळताच मांधाता पोलिस स्टेशनचे टीआय बलरामसिंग राठोड पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ओंकारेश्वर रुग्णालयात नेला. वडिलांना ओंकारेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Khandwa Death by Drowning Brahmapuri ghat )

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details