दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमधली मरगळ दूर; ग्राहकांचा भारतीय वस्तुंना उत्स्फूर्त प्रतिसाद - Etv Bharat news
नागपूर - दिवाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे खरेदीची लगबग असून नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत स्वदेशी आणि चीनी वस्तूंमध्ये नेहेमी संघर्ष पाहायला मिळते. स्वदेशी आणि चायनीज वस्तूंच्या या संघर्षात नागपूरकरांनी यंदा स्वदेशीचा नारा देत भारतीय वस्तूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.