VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू - हिमाचलमध्ये भुस्खलन
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. या अपघातात 9 लोकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी गावाला जोडणारा पुलही नुकसानग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृतांची संख्या व नुकसानीचा आकडा वाढू शकतो. बटसेरीच्या डोंगरावरून अजुनही दगड-गोटे खाली कोसळत आहेत. या दुर्घटनेत नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची व तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.