महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Flood situation in Umarkhed : उमरखेड, महागावमध्ये पूर परिस्थिती; अनेक गावांचा संपर्क तूटला

By

Published : Jul 14, 2022, 12:35 PM IST

यवतमाळ - यवतमाळच्या महागाव व उमरखेड तालुक्याला अतिपावसाचा तडाखा ( Heavy Rain In Yawatmal ) बसला आहे. शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचे पाणी शिरले ( Water Entered Into Agricultural Land ) आहे. शेतांना तलावाचे स्वरूप आल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत तर शेतजमिनी खरडून गेल्या आहे. गेल्या ६ दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस अविश्रांत बरसत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसाने नदी - नाल्यांना पूर आला आहे. महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांत पुरस्थितीने हाहाकार ( Flood Situation In Mahagaon and Umarkhed ) केला आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून ( Panganga River Overflow ), पुराचे पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात शिरले आहे. महागाव तालुक्यातील शिरपूल्ली गावात नदीचे पाणी शिरत ( Flood Situation In Shirpulli village )आहे. आधीच शेतकऱ्यांना जून महिन्यात पाऊस न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता जुलैत अतिवृष्टी झाल्याने ही पेरणी पाण्यात बुडाली. शेतशिवार जलमय झाल्याने व पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. उमरखेड तालुक्याला जोडणारे अनेक मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद पडले आहे. त्यामुळे उमरखेड येथे शाळांना सुटी ( School Closed in Umarkhed ) देण्यात आली आहे. अनेक गावांना पुराचा वेढा आहे. त्यामुळे आमदार नामदेव ससाणे हे स्वतः पावसात शेतशिवारात जाऊन पाहणी करीत ( MLA Namdev Sasane inspect Situation ) आहे. नदीकाठी वसलेल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details