महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Father Son Drowned In Pool : जालना : पोहण्यास गेलेल्या बाप, लेकाचा तलावात बुडून मृत्यू - तलावात बुडून वडील मुलाचा मृत्यू

By

Published : Apr 26, 2022, 8:13 PM IST

जालना : शहरातील मोती तलाव ( Moti Talav In Jalna ) परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणापैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू ( Father Son Drowned In Pool ) झाला. दुपारी पाचच्या सुमारास ही घटना घडली. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना आपला मुलगा बुडत असल्याचं पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप- लेक बुडाले. घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी ( Chandanzira Police Jalna ) घटनस्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून या बाप- लेकाचा शोध घेत मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेने परिसरात एकाच हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details