VIDEO : भारतात चीनसारखी परिस्थिती उदभवू शकते का? - कोरोनाची चौथी लाट
उस्मानाबाद : सध्या देशात पुन्हा कोरोना बधितांची संख्या वाढत चालली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून पुन्हा कोरोना तीव्र लाट येणार का? अशी भीती नागरीकांना उदभवू लागली आहे. मात्र यावर मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए.एम देशमुख यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे. देशात ओमायक्रोनची लागण जवळपास सर्वांनाचं झाल्याचे तज्ज्ञ सांगतात, त्यामुळे भारताच्या नागरिकांमध्ये हर्ड आणि कम्युनिटी इम्युनिटी विकसित झाली आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे. म्हणून चीनसारखी परिस्थिती भारतात उदभवणार नाही, अशी महत्वाची आणि दिलासादायक माहिती डॉ. देशमुख यांनी ईटीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.