VIDEO : अणुबॉम्बपेक्षा जैविक बॉम्ब हा जास्त घातक; पाहा काय म्हणतात तज्ञ..
उस्मानाबाद : यापुढे जगाला जैविक दहशतवादाची भीतीभविष्याकाळात जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्यात शस्त्रास्त्रे किंवा अणुबॉम्बपेक्षा जैविक बॉम्ब हा जास्त घातक ठरू शकतो. भारतावर देखील जैविक दहशतवादाचा संकट ओढावू शकतो. भारताचे सर्वच देशासोबत चांगले संबंध आहेत, असं नाही. म्हणून भविष्यकाळात येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी भारत सरकारने तशे कायदे करणे गरजेचे असल्याचे डॉ. देशमुख सांगतात. अमेरिकेसारख्या राष्ट्राने ही भीती ओळखून तशा पद्धतीचे कायदे देखील केले आहेत. म्हणून भारत सरकारने तशा तरतुदी करून ठेवाव्या, अशी पत्राद्वारे आपण मागणी केल्याचे देखील मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. देशमुख यांनी सांगितले