Video : केरळ : नदीच्या पुरात मधोमध अडकला हत्ती, पहा नदी पार करण्याचा थरार.. - Elephant stranded Chalakudy river kerala
त्रिशूर ( केरळ ) : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर चालकुडी नदी ओलांडताना एक हत्ती नदीच्या मध्यभागी अडकला. या दरम्यान नदीच्या पाणी पातळीत सुमारे 5 मीटरने वाढ झाली. नदीचा प्रवाह एवढा जास्त होता की हत्तीलाही ते ओलांडणे कठीण झाले होते. त्यामुळे नदीत अनेक तास झाडाच्या सहाय्याने उभे राहावे लागले. हत्तीला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह वनविभागाचे अधिकारीही पोहोचल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर हत्तीने स्वत:हून नदी पार केली. यादरम्यान हत्तीने नदी ओलांडण्यासाठी अनेक वेळा आपल्या सोंडेने पाण्याची खोली मोजली, त्यामुळे तो नदी पार करण्यात यशस्वी झाला. ( Elephant stranded Chalakudy river kerala ) ( Elephant stranded Chalakudy river thrissur )