महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Resign as Chief Minister : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्यास उशीर करू नये - आचार्य प्रमोद कृष्णम - आचार्य प्रमोद कृष्णम

By

Published : Jun 22, 2022, 7:00 PM IST

नवी दिल्ली/गाझियाबाद: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीला आठ मंत्री उपस्थित राहिले नाहीत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना ही महत्त्वाची बैठक झाली आहे. मात्र, आपण कोणाच्याही संपर्कात नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. सर्व आमदार त्यांच्या स्वेच्छेने त्यांच्यासोबत आले आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडू शकते. दरम्यान, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम ( Senior Congress leader Acharya Pramod Krishnam ) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा ( Resign as Chief Minister ) सल्ला दिला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, लोकशाहीत जनभावनांचा आदर करून नैतिक मूल्यांचे पालन केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेच्या दारात कधीही डोके टेकवले नाही. अशा स्थितीत आता उद्धव ठाकरे यांनी नैतिक मूल्यांचे पालन करत मराठा स्वाभिमान जपत पद सोडावे.

ABOUT THE AUTHOR

...view details