भारत माझा देश आहे म्हणायला लाज वाटतेय, बलात्कारप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर तरुणी संतप्त - ससून रुग्णालय पुणे
पुणे - झारखंड आणि हैदराबादमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हैदराबाद येथील घटना ताजी असतानाच राजस्थान येथेही एका ६ वर्षीय बालिकेवर नराधमांनी लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली. याबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्येही अशीच घटना घडली होती. तेव्हाही आरोपींना कठोर शिक्षा करून देशातील कायदे आणखी कठोर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप अशा घटना घडतच असून समाजकंटकना कायद्याचा धाक उरला नसल्याचे स्पस्ट झाले आहे. याबाबत पुण्यातील ससून रुग्णालयातील काही डॉक्टर तरुणींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी...