'टी सिरीज'विरोधात भडकवणे बंद कर, सोनू निगमला दिव्याचा इशारा - Divya Khosala kumar
मुंबई - गायक सोनू निगमने टी सिरीजचे चेअरमन आणि एम डी भूषण कुमार यांच्याविरोधात एक पोस्ट लिहिली होती. यातील सूर बराचसा धमकीचा होता. यानंतर भूषण कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन पलटवार केला आहे. दिव्याने सोनूवर खोटे विकून पब्लिसीटी मिळवत असल्याचा आरोप केलाय. टी सिरीजच्या विरोधात भडकवणे बंद करण्याचा सल्लाही त्यांनी सोनूला दिलाय.