वरुड - मोर्शी विधानसभा मतदार संघात देवेंद्र भुयार यांचा विकाम कामांचा सपाटा; अडीच कोटींची विकास कामे सुरु - वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघ
अमरावती - वरुड - मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra bhoyar ) यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतली आहेत. या अंतर्गत त्यांनी 2 कोटी 43 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळणार आहे असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. यावेळी शिंभोरा येथील जि.प. शाळा ते हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे 10 लक्ष रु, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे 5.75 लक्ष रु, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे भूमिपूज 7 लक्ष रु असा विविध विकास कामांना निधी दिला आहे. देवेंद्र भुयार यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यांनी आपल्या मतदार संघात विकासकामांचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे.