Ringan Sohala : टाळ आणि मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन वारकरी; पाहा व्हिडिओ - विठ्ठल नामाच्या जयघोषात तल्लीन वारकरी
पंढरपूर : नुकतेच आषाढी एकादशी ( Aashadi Ekadashi ) झाली आहे. दोन वर्षानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले होते. या आषाढी वारीतील रिगंण सोहळ्याचे दृश्य पाहिल्यानंतर मानसाचे डोळे तृप्त होतात. अशीच अनुभूती येणारा एक व्हिडिओ संरक्षण मंत्रालयातील अधिकारी सुशील गायकवाड ( Defense Ministry official Sushil Gaikwad ) यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत टाळ आणि मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करताना तल्लीन होऊन वारकरी रिंगण सोहळा करताना दिसत आहेत. गायकवाड यांनी टाळ मृदंगाच्या आवाजावर प्रेम करा असे म्हटले आहे. या व्हिडिओतील टाळ आणि मृदंगाच्या आवाजाने आपले कान तृप्त झाल्यांची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. ( Ekadashi Ringan Sohala Video )