महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Massage In Police Station : पोलीस ठाण्यातच महिलेकडून करून घेतला मसाज.. अधिकाऱ्याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By

Published : Apr 29, 2022, 6:56 PM IST

सहरसा : बिहार पोलीस ( Bihar Police ) नेहमीच आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असतात. असेच एक प्रकरण सहरसा दरहरमध्ये समोर आले आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी शशिभूषण सिन्हा ( Darhar SHO Shashibhushan Sinha ) हे सहरसा येथील महिलेकडून मोठ्या आनंदाने मसाज घेताना दिसत ( Daroga taking massage from woman in Saharsa ) आहेत. त्याच्या समोरच दुसरी महिला खुर्चीवर बसलेली आहे. पोलिस ठाण्यात मसाज ( Massage In Police Station ) घेत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत ( Saharsa Viral Video ) आहे. हा व्हिडिओ दोन महिने जुना असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला दिसत आहेत. SHO साहेब एका महिलेकडून मसाज घेत आहेत. त्या महिलेच्या मुलाला 2 दिवसांपूर्वी तुरुंगात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. पण एसएचओला मसाज करवून घ्यावा वाटला. म्हणून त्याने महिलेकडून मसाज करून घ्यायला सुरुवात केली. SHO फोनवर महिलेच्या मुलाला सोडण्यास सांगताना दिसत आहे. एसएचओ वकिलाशी बोलत असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details