Drunk Cock Bhandara : ऐकावे ते नवलच! भंडाऱ्यात कोंबडा झाला अट्टल दारुडा - कोंबड्याला दारूचे व्यसन
भंडारा - आजवर आपण पुरुषाला किंवा स्त्रीला दारुचा व्यसन जडल्याचे ऐकले असाल. मात्र कोंबडाही दारु पितो यावर विश्वास बसणे कठिण आहे. परंतु हे खर आहे. भंडाऱ्यात चक्क एका कोंबड्याला दारूचं व्यसन ( Drunk Cock Bhandara ) जडले आहे. इतकंच काय तर दारू घेतल्याशिवाय कोंबडा अन्नाचा कणही घेत नाही. जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन ( Pipri village Bhandara ) गावातील भाऊ कातोरे यांनी हा कोंबडा पाळला आहे. कसा लागला कोंबड्या दारुचं व्यसन पाहा, विशेष रिपोर्ट...