CM Thackeray Video : कोरोना, हिंदूत्व, राजीनामा, चर्चा आणि आवाहन; पाहा, मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण व्हिडिओ - Maharashtra Political crisis
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेनेला दिलेल्या थेट आव्हानानंतर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी अखेर आज फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देतील अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळीही मुख्यमंत्री राजीनामा देतील अशी चर्चा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी मी राजीनामा द्यायला तयार आहे, बंडखोरांनी समोर यावे असे भावनिक आवाहन केले. ( Maharashtra Political Crisis )