''गड्या आपला गावंच बरा'', पंकज त्रिपाठीने गाठले जन्म गाव!! - पंकज त्रिपाठीने गाठले गाव
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी शेरदिल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गोपालगंज येथील त्याच्या घरी पोहोचला आहे. इथे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यादरम्यान तो आपल्या मित्रांसोबत खेडूत पध्दतीने मस्ती करताना दिसत आहे. बरौली ब्लॉकमधील त्याच्या मूळ गावी बेलसांडमध्ये त्याने स्वतः लिट्टी बनवली आणि आनंदाने बोअरवेलवर अंघोळही केली. पंकजने सांगितले की, यावेळी तो 5-6 महिन्यांनी गावी आला आहे, त्यामुळे तो पूर्ण वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाबद्दल तो म्हणाले की, शेरदिल - द पिलीभीत सागा ही कथा सत्य घटनेने प्रेरित आहे. ज्यात त्याची व्यक्तिरेखा गंगाराम (पंकज त्रिपाठी) या गावाच्या एका प्रमुखाची आहे, जो गावाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. गंगाराम हे गाव व्याघ्र प्रकल्पाजवळ असून वाघ व वन्य प्राण्यांनी गावकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. हे वन्य प्राणी आपल्या जंगलाची हद्द तोडून गावात घुसून पिकांची नासधूस करतात.