महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

खैरे शिरसाट समेट घडवण्यासाठी भागवत कराड सरसावले, तर गणेश विसर्जन मिरवणुकीत अंबादास दानवे प्रदीप जैस्वालांनी धरला ढोलच्या तालावर ठेका - खैरे शिरसाट समेट घडवण्यासाठी भागवत कराड सरसावले

By

Published : Sep 9, 2022, 7:41 PM IST

Updated : Sep 9, 2022, 7:49 PM IST

औरंगाबाद - संस्थान गणपती मिरवणुकीत भाजपचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड ( Union Minister Bhagwat Karad ) राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय सिरसाट सोबत चालत असताना सेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांना भागवत कराड यांनी हाताला धरून संजय सिरसाट यांच्या बाजूला उभे केले. गणपती विसर्जन मिरणुकीच्या निमित्ताने त्यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचाच प्रयत्न केल्याचे चित्र दिसले. खैरे सिरसाट यांच्याकडे पाहून हसले तसेच सिरसाटही खैरेंकडे बघून हसले. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Leader Opposition Legislative Council Ambadas Danve ) आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रदीप जैस्वाल ( MLA Pradeep Jaiswal ) यांनी ढोलच्या तालावर ठेका धरलेला दिसला. एकूणच गणेश विसर्जन मिरवणुकीत एकमेकातील कटुता दूर होत असल्याचे चित्र औरंगाबादच्या मिरवणुकीत दिसले.
Last Updated : Sep 9, 2022, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details