Ashadhi Wari 2022 : पुन्हा टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गस्त झाला 'पालखी सोहळा' - Ashadhi Wari Palkhi ceremony
गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे वारीचा ( Ashadhi Wari 2022 ) दैवी सोहळा वारकऱ्यांना अनुभवता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव निवळला आणि या वारीच्या सोहळ्याची सर्वच वारकऱ्यांना आस लागली होती. ही आस डोळ्यात ठेऊन या भक्ती सोहळ्याची अनुभुती आता सर्व विठूरायाच्या भाविकांना घेता येणार आहे. टाळ मृदुगांचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे ( Sant Tukaram Maharaj Palkhi ) पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. अनेक किलोमिटरचा पायी प्रवास करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन तल्लीन होणाऱ्या भाविकांच्या भावना सांगणारा विशेष रिपोर्ट....