आकरा वर्षाच्या देवांश धनगरची कमाल! तयार केलेल्या कोडिंगची जगात चर्चा - आकरा वर्षाच्या देवांशने कोडिंग तयार केले
आगरा (उत्तर प्रदेश)- आग्रापासून 11 किमी अंतरावर असलेल्या बरारा गावात राहणाऱ्या देवांश धनगर (वय, 11) यांनी लहान वयातच कोडिंगच्या जगात खास ओळख निर्माण केली आहे. 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या देवांशच्या प्रतिभेला नासानेही सलाम केला आहे. कदाचित यामुळेच नासाने देवांशला (2026)च्या मंगळ मोहिमेच्या कोडिंग टीमचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आतापर्यंत दहाहून अधिक अॅप्स तयार करणाऱ्या देवांशने 500 हून अधिक मुलांना ऑनलाइन कोडिंगचे मोफत शिक्षण दिले आहे. त्याच्या या कामगिरीने कुटुंबासह परिसरातून कौतुक होत आहे.